Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस्ट्री मॅनच्या हातात हात घालून फिरताना दिसली मलायका, अर्जुन कपूर पोस्ट लिहित म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:31 IST

अर्जून कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं आहे.  ब्रेकअप झालं असलं तरीही दोघे कायम चर्चेत आहेत. दोघांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असतं. आता नुकतंच मलायका ही एका मिस्ट्री मॅनसोबत हातात हात घालून फिरताना दिसली होती. यावरुन  ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं.  यातच आता अर्जून कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जून कपूरही त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे. तो आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. आता नुकतंच  अर्जून कपूरने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने 'सिंगम अगेन' सिनेमाच्या एका सेटवरील त्याचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो, तुम्ही 'डेंजर लंका' आणि 'सिंघम अगेन'वर दाखवलेल्या विलक्षण प्रेम दाखवलं.  कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने नोव्हेंबर महिना संपत आहे". अर्जूनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी २०१८ मध्ये डेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपले नाते गुप्त ठेवले. पण नंतर त्यांनी ते जाहीर केले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे नाते अधिकृत केले. दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर होते. पण आता दोघेही एकत्र नाहीत. काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. अर्जुन कपूर हा 'सिंगम अगेन' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होता. या सिनेमातील त्याच्या पात्राला भरपूर प्रेम मिळालं. तर मलायका ही 'माझा येक नंबर' या मराठी गाण्यात दिसली होती.  

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूडमलायका अरोरा