Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कपूर- मलायका अरोराचे ‘खुल्लम खुल्ला...’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 12:40 IST

बॉलिवूडचे हे हॉट कपल सध्या ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’ थाटात फिरतेय.

ठळक मुद्देअलीकडे हे कपल  संजय कपूर यांच्या न्यू ईअर पार्टीत हातात हात घालून दिसले होते.  या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली होती.

बॉलिवूडचे हॉट कपल कोण? असा प्रश्न विचारायची देर की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे नाव सगळ्यात आधी येईल. बॉलिवूडचे हे हॉट कपल सध्या ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’ थाटात फिरतेय. अगदी जगाची पर्वा न करता ‘लव्ह लाईफ’ एन्जॉय करताहेत. अलीकडे अर्जुन व मलायका नाईट पार्टी एन्जॉय करताना दिसले. पार्टीतून बाहेर पडतांनाचे त्यांचे फोटो क्षणात व्हायरल झालेत.  

शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिने आयोजित केलेल्या या पार्टीत मलायका व अर्जुनसोबत अमृता अरोरा, करिश्मा कपूर अशी सगळी गर्ल गँग दिसली. या गर्लगँगमध्ये एकटा ‘बॉय’ दिसला, तो म्हणजे अर्जुन. पार्टी एन्जॉय केल्यानंतर अर्जुन व मलायका दोघेही एकमेकांसोबत बाहेर पडले. अर्जुन पूर्णवेळ मलायकाची काळजी घेताना, तिला जपतांना दिसला. विश्वाय बसत नसेल तर हे फोटो एकदा पाहाच... 

अलीकडे हे कपल  संजय कपूर यांच्या न्यू ईअर पार्टीत हातात हात घालून दिसले होते.  या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली होती. केवळ इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला होता.यापूर्वी अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले होते. या पार्टीतही अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून पोहोचले होती. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर होती तर अर्जुन कपूर ड्राईव्ह करताना दिसला होता. अर्जुनच्या बाजूच्या सीटवर त्याचे काका संजय कपूर होते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरकरिश्मा कपूरगौरी खान