Join us  

Video: अरबाज खानने लेकाच्या मित्राला रिलेशनशिपबाबत दिला अजब सल्ला, पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 5:44 PM

मजामस्तीत चाललेल्या गप्पांमध्ये अरबाजने अरहानच्या मित्राला एक मजेशीर सल्ला दिला.

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा यांचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांनी १९ वर्षांचा संसार मोडला. दोघांना अरहान (Arhaan Khan) हा २१ वर्षांचा मुलगा आहे. अरहान आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक कंटेंट पेज सुरु केले आहे ज्याचं नाव Dumb Biryani असं आहे. अरहान, त्याचा मित्र आयुष वर्मा आणि देव रैयानी यामध्ये पॉडकास्ट घेत असतात. येत्या एका एपिसोडमध्ये अरहानने वडील अरबाज आणि काका सोहेलला बोलवले होते. तेव्हा मजामस्तीत चाललेल्या गप्पांमध्ये अरबाजने अरहानच्या मित्राला एक मजेशीर सल्ला दिला.

अरहान खानने मित्रांसोबत मिळून सुरु केलेला पॉडकास्ट हा डेटिंग टिप्स, रिलेशनशिपवर आधारित आहे. कॉमेडी गप्पांमुळे प्रेक्षकांना हसवणारा हा शो आहे. येत्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये अरबाज आणि सोहेल खान सहभागी होणार आहेत. याचा एक टीझर नुकताच रिलीज झाला. अरबाज-सोहेल यांच्यातील विनोदी संभाषण, मजेशीर प्रश्न उत्तरांमुळे प्रेक्षक पोट धरुन हसतील. दरम्यान अरहानच्या मित्राने रिलेशनशिपमधील निर्णय घेण्यावर सल्ला विचारला की नात्यात नक्की काय हवंय हे कळत नसेल तर यावर अरबाज म्हणाला, 'मला वाटतं तू शारीरिक संबंधाची निवड केली पाहिजे.' अरबाजचं हे उत्तर ऐकून सगळेच जोरजोरात हसतात. खान कुटुंबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

विशेष म्हणजे या व्हिडिओवर मलायका अरोरानाही कमेंट केली आहे. ती सुद्धा या संभाषणावर खूप हसल्याचं तिने लिहिलं आहे. अरहानचं डंब बिर्यानी हे पेज चांगलंच व्हायरल होतंय. ओरी, आशिष चंचलानी मलायका अरोरा, बॉलिवूड वाईफ्स सुद्धा यात सहभागी झाले आहेत. स्टारकीडच्या या पॉडकास्टची चर्चा आहे.

टॅग्स :अरबाज खानबॉलिवूडसोशल मीडियारिलेशनशिप