Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर बदललं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचं नाव? कुणालने कानात सांगितलं नवीन नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:43 IST

कुणाल भगतने लग्नानंतर आपल्या बायकोचं नाव बदलून काय ठेवलं?

Ankita Walawalkar: 'बिग बॉस मराठी' फेम कोकणकन्या अंकिता वालावकर सध्या चर्चेत आहे. अंकिता वालावलकरने कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे. अंकिताच्या गावी म्हणजेच कोकणात देवबाग येथे या दोघांनी लग्नगाठ बांधली. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. लग्नानंतर नाव बदलण्याची एक जुनी प्रथा आहे. सध्याच्या काळात बऱ्याच मुली लग्नानंतर आपलं नाव बदलत नाहीत. ही प्रथा अंकिताच्या लग्नातही पार पडली.   अंकिताच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये कुणाल अंकिताचं लग्नानंतरच नाव तिला कानामध्ये सांगताना दिसतोय.  यावरून कुणालने अंकिताचं लग्नानंतरचं नाव काय ठेवलं असेल याची चर्चा रंगली आहे. तर कुणालने लग्नानंतर अंकिताचे नाव अंकिता असंचं ठेवलं आहे. व्हिडीओमध्ये अंकिताला जेव्हा सर्वजण नाव काय ठेवलं असं विचारतात, तेव्हा अंकिता म्हणते, "मी नावं ठेवण्यासारखी नाहीच आहे, यामुळं माझं नाव अंकिताच ठेवलं आहे".

अंकिता आणि कुणालची लव्हस्टोरीही खूपच हटके आहे. अंकिता ही सोशल मिडिया इन्फ्युएन्सर, अभिनेत्री आहे. अंकिता आणि कुणालची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली. झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये अंकिता होस्टिंग करत होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता दोघांनी संसार थाटलाय. अंकिता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. मात्र तिला 'बिग बॉस मराठी 5' खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक गाण्यांचे दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरलग्न