Join us

Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:52 IST

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ३१ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता झाली आहे. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये घडलेली घटना सांगितली आहे. पोलीस आणि लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे. अभिनेत्रीच्या मोलकरणीची मुलगी आणि तिची मैत्रीण बेपत्ता होऊन एक दिवस झाला आहे. 

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ३१ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले आहेत. तिने एफआयआरचा फोटो देखील पोस्ट केला आहे आणि लिहिलं आहे की, "आमची हेल्पर कांता हिची मुलगी, तिची मैत्रीण सलोनी आणि नेहा ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्या शेवटच्या वाकोला परिसरात दिसल्या होत्या. मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही."

या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करताना अंकिता म्हणाली, "ते फक्त आमच्या घराचा भाग नाहीत, ते कुटुंब आहेत. आम्ही खूप दुःखी आहोत आणि विशेषतः मुंबई पोलीस, मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी ही बातमी सर्वत्र पसरवावी आणि मुली सुरक्षित परत यावी यासाठी कोणत्याही प्रकारे मदत करावी. जर कोणी काही पाहिलं किंवा ऐकलं असेल तर कृपया ताबडतोब संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. तुमचा पाठिंबा आणि प्रार्थना यावेळी खूप महत्त्वाची आहे."

अंकिता लोखंडेने देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुंबई पोलिसांसह टॅग करत मदत मागितली आहे. अंकिता अलीकडेच भारती सिंहच्या 'लाफ्टर शेफ' या सेलिब्रिटी कुकिंग-कॉमेडी रिएलिटी शोमध्ये पती विकी जैनसोबत दिसली. या शोमध्ये कृष्णा अभिषेक, राहुल वैद्य, करण कुंद्रा, निया शर्मा, रीम शेख, एल्विश यादव, रुबिना दिलाइक, अली गोनी, सुदेश लाहिरी आणि कश्मीरा शाहसारखे स्टार आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेगुन्हेगारीपोलिस