Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nayak 2 : तब्बल २३ वर्षांनंतर येणार 'नायक' सिनेमाचा सिक्वल, अनिल कपूर पुन्हा बनणार CM?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 18:03 IST

'नायक'प्रमाणेच 'नायक २' देखील एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे. 

बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'नायक'. अनिल कपूर, अमरिश पुरी, राणी मुखर्जी, परेश रावल अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला तर तुम्हाला चॅनेल बदलावसं वाटणार नाही. पॉलिटिकल थ्रिलर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता या सिनेमाच्या सिक्वलबाबत चर्चा रंगल्या आहेत. 

२००१ साली अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा प्रदर्शित झाला होता. राजकारण आणि प्रशासनावर बोट ठेवणाऱ्या या सिनेमात अनिल कपूर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्याचं दाखविण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने एका दिवसात धडाडीचे निर्णय घेत संपूर्ण सिस्टिम बदलण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र नायक सिनेमातून उभारण्यात आलं होतं. आता तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा पॉलिटिकल ड्रामा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'नायक २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 'नायक २' सिनेमा बनवणार आहेत. मार्फ्लिक्स पिक्चर द्वारे या चित्रपटाची ते निर्मिती करणार आहेत. 'नायक'प्रमाणेच 'नायक २' देखील एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे. 

'नायक २' सिनेमाचं कास्टिंग सुरू आहे. या सिनेमातून एक नवा पॉलिटिकल ड्रामा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल कपूर पुन्हा या सिनेमात दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या सिनेमाबाबत आणि कास्टिंगबाबत अद्याप टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.  

टॅग्स :अनिल कपूरसिनेमासेलिब्रिटी