1999 मध्ये रिलीज झालेला 'सूर्यवंशम' (Sooryavansham) हा सिनेमा विसरणं कोणत्याही प्रेक्षकाला शक्य नाही. त्याकाळी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. मात्र, तो टिव्हीवर प्रसारित झाल्यावर त्याला तुफान यश मिळालं. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. हा सिनेमा रिलीज होऊन आज बरीच वर्ष झाली. त्यामुळे यातील कलाकार सध्या काय करतात, ते कसे दिसतात हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या सिनेमातील बालकलाकाराविषयी जाणून घेऊयात.
सूर्यवंशम या सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या ठाकूर भानुप्रताप सिंह आणि हिरा भानु प्रताप या दोन्ही भूमिका विशेष गाजल्या. या सिनेमामध्ये त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. परंतु, या सगळ्यांसोबतच आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे हिरालालच्या लेकाची म्हणजेच सोनूची. ही भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती.
सध्या काय करतो सूर्यवंशमचा सोनू
आनंद वर्धन याने सूर्यवंशममधील सोनू ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. सूर्यवंशम हा त्याचा एकमेव बॉलिवूड सिनेमा होता. विशेष म्हणजे आजही तो कलाविश्वात सक्रीय आहे. मात्र, त्याने साऊथ इंडस्ट्रीत त्याचा जम बसवला आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी त्याने Priyaragalu या सिनेमातून त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याचा इंडस्ट्रीतला प्रवास सुरु झाला. आज आनंद वर्धन साऊथमधील लोकप्रिय अभिनेता झाला असून त्याच्या स्टायलिश लूक आणि पर्सनालिटीची कायम चर्चा होतांना दिसते.
Web Summary : Suryavansham's Sonu, played by Anand Vardhan, is now a popular South Indian actor. He started his career at age four and continues to thrive in the film industry with a stylish look.
Web Summary : सूर्यवंशम के सोनू, आनंद वर्धन, अब एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता हैं। उन्होंने चार साल की उम्र में अपना करियर शुरू किया और स्टाइलिश लुक के साथ फिल्म उद्योग में आगे बढ़ रहे हैं।