Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 19:30 IST

'या' व्यक्तीमुळे रेखा आणि अमिताभ यांच्या वाद झाला अन् बि बींनी थेट रेखाच्या कानाखालीच मारली.

बॉलिवूडमध्ये नेहमी एका जोडीच्या अफेअरची नेहमीच चर्चा होते. ती म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) . दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. मात्र हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही अमिताभ बच्चनरेखासमोर यायचं टाळतात. पण तुम्हाला माहितीये का बिग बींनी एकदा रागात रेखाच्या कानाखाली मारली होती. हा बऱ्याच वर्षांपूर्वीच किस्सा आहे. नक्की काय घडलं होतं जाणून घेऊया.

बिग बींचा 'लावारिस' हा सिनेमा आठवत असेलच. 1981 साली सिनेमा रिलीज झाला होता. याच सिनेमाच्या शूटदरम्यान सेटवर एक ईरानी डान्सर होती. अमिताभ बच्चन त्या डान्सरच्या प्रेमात पडल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. हे जेव्हा रेखा यांच्या कानावर पडलं तेव्हा त्या रागारागात थेट सेटवरच पोहोचल्या. रेखा यांना पाहून सर्वच शॉक झाले. कारण तेव्हा रेखा आणि अमिताभ यांचे अनेक किस्से पेपरमध्ये यायचे. रेखा यांनी संतापून अमिताभ बच्चन यांना प्रश्नांवर प्रश्न विचारले. रेखाचा राग काही कमी होत नव्हता आणि बिग बीही आता संतापले होते. मग काय वाद वाढत गेला आणि बिग बींनी रागात रेखाच्या कानाखालीच वाजवली. 

अमिताभ बच्चन यांच्या अशा वागण्यामुळे रेखा प्रचंड नाराज होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या 'सिलसिला' सिनेमातही काम करण्यास नकार दिला. यामुळे यश चोप्रा चिंतेत पडले कारण त्या सिनेमात रेखा आणि अमिताभ मुख्य भूमिकेत होते. पण नंतर त्यांनी रेखाची मनधरणी केली आणि नंतर त्या सिनेमात काम करण्यास तयार झाल्या.

रेखा यांनी अनेकदा मुलाखतींमधून बिग बींवरचं प्रेम व्यक्त केलंय. मात्र अमिताभ यांनी कायम त्यांचं नातं नाकारलं आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखाबॉलिवूडसिनेमादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट