Join us

"आमच्या धर्मात याची परवानगी नाही", अखेर अली गोनीने सोडलं मौन, 'गणपती बाप्पा मोरया' न बोलल्याने झालेला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:14 IST

निया आणि जास्मिन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होत्या. मात्र अलीने काहीच म्हटलं नाही. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अली गोनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अली गोनीचा गणपतीदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अली त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसिन आणि निया शर्मासोबत दिसत होता. निया आणि जास्मिन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होत्या. मात्र अलीने काहीच म्हटलं नाही. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. 

अली गोनीने फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. अली म्हणाला, "ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. मी याआधी कधीच गणपतीच्या पूजेला गेलो नाही. त्यामुळे मी माझ्याच विचारात होतो. मला खरंच माहीत नव्हतं की यामुळे इतका मोठा वाद निर्माण होऊ शकतो. मी नेहमी हाच विचार करत असतो की अशा ठिकाणी जाऊन माझ्याकडून काही चुकीचं घडू नये". 

"आमच्या धर्मात याची परवानगी दिलेली नाही. आमच्याकडे मूर्तीची पूजा वगैरे केली जात नाही. पण, कुराणमध्ये असं लिहिलं गेलं आहे की तुम्ही प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. त्यामुळे मीदेखील प्रत्येक धर्माचा आदर करतो. जे लोक मला ओळखतात त्यांना हे नक्कीच माहीत आहे. माझ्या मनाच प्रत्येक धर्मासाठी आदर आहे", असंही तो पुढे म्हणाला. ट्रोलिंगवर अली गोनीने सांगितलं की "मी सोशल मीडियावर एक पेज पाहिलं जे मुलगी चालवत होती. आणि त्या पेजवरुन तिने माझ्या आईला शिव्या दिल्या. एक मुलगी एका महिलेबाबत इतकं वाईट बोलत होती". 

टॅग्स :गणेशोत्सवटिव्ही कलाकार