Join us

"रुकेगा नहीं!" अल्लू अर्जुनने पापाराझींना इग्नोर करत दाखवला अ‍ॅटिट्यूड; नेटकरी म्हणाले- शाहरुख पण इतका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 16:19 IST

अल्लू अर्जुनचा मुंबई विमानतळावरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात तो पापाराझींना इग्नोर करताना दिसतोय.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) ची फॅन फॉलोइंग केवळ साऊथमध्येच नाही तर पुष्पा(Pushpa)  नंतर तो पॅन इंडिया स्टार झाला आहे. यामुळेच हा साऊथचा स्टार जिथे जिथे दिसतो तिथे त्याला चाहते घेरतात, पण काही वेळा चाहत्यांकडे दुर्लक्ष करणे हे स्टार्सना जरा जास्तच त्रासदायक ठरते. अल्लूसोबतही असंच काहीसं झालं. अल्लू मुंबई विमानतळावर दिसला, पण त्याने चाहत्यांसोबत फोटो काढण्यास नकार दिला तेव्हा लोकांना त्याचा हा अ‍ॅटिट्यूड अजिबात आवडला नाही आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. 

अल्लू अर्जुन झाला ट्रोलत्याचं झालं असं की, अल्लू अर्जुन नुकताच मुंबईत काही कामानिमित्त आला होता. आज सकाळी तो मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा पापाराझींनी त्याच्याकडे धाव घेतली. अल्लूही जबरदस्त स्वॅग दाखवत विमानतळाच्या आत जाऊ लागला. अंगरक्षकाने त्याला घेरले होते. विनंती करूनही, अल्लू अर्जुन ना पापाराझींना पोझ देण्यासाठी थांबला ना चाहत्यांसोबत सेल्फि काढला. अल्लू अर्जुनचा हा अ‍ॅटिट्यूड बघून नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

एका यूजरने कमेंट केली - 'याला ऐवढा अ‍ॅटिट्यूड आहे तर शाहरुख खानला किती असेल.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले - 'चाहते त्याचा चित्रपट पाहतात आणि यांना स्टार बनवतात पण हे एक सेल्फीही घेऊ शकत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स यापेक्षा जास्त चांगले वागतात.

सध्या अल्लू अर्जुन पुष्पा २च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन बंगळुरूमध्ये शूट केला जात आहे. लवकरच मल्याळम अभिनेता फहाद फाजील यात सामील होणार आहे. पुढील महिन्यात अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत, निर्माते अभिनेत्याच्या खास दिवशी तीन मिनिटांचा अ‍ॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करणार आहे.

  

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodपुष्पाविमानतळ