Join us

धमाकेदार अ‍ॅक्शन अन् ड्रामा... 'पुष्पा २'च्या यशानंतर अल्लू अर्जुन घेऊन येतोय नवा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:59 IST

अल्लू अर्जुन आता त्याच्याआवडत्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहे.

Allu Arjun: अल्लू अर्जुन हा चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. फक्त भारतात नाही तर जगभरात त्याचा बोलबाला आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर त्याचा दुसरा भाग 'पुष्पा २: द रुल'नं तर एक नवा इतिहासही रचला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर तर झालाच, पण सोबतच भारतात सर्वांत जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. आता 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule) अल्लू अर्जून एक नवकारो सिनेमा घेऊन येत आहे. 

'पुष्पा २: द रुल' च्या ऐतिहासिक यशानंतर अल्लू अर्जून कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.अल्लू अर्जून आता एक पौराणिक चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेलं नाही. पण, हा चित्रपट अल्लू अर्जूनचा २२ वा चित्रपट असल्यानं AA22 म्हणून ओळखला जात आहे. 

पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास (Trivikram Srinivas) यांच्यासोबत अल्लू अर्जूनने हात मिळवला आहे. हा या दोघांचा चौथा चित्रपट असणार आहे. याआधी, या हिट जोडीने 'Julayi', 'एस/ओ सत्यमूर्ती' आणि 'अला वैकुंठपुरमुलू' मध्ये एकत्र काम केलं होतं. हा नवा चित्रपट देव मुरुगा (कार्तिकेय ) यांच्या कथेवर आधारित असणार आहे. मुरुगा हे कार्तिकेय (karthikeyan) भगवानाचे एक नाव आहे. मुरुगाला युद्ध, धैर्य आणि संरक्षणाची देवता मानले जाते. त्यांची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि विशेषतः तामिळनाडूमध्ये केली जाते.

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचे नाव 'गॉड ऑफ वॉर' असेही म्हटलं जात आहे. तथापि, या प्रकल्पाबाबत अल्लू अर्जुन किंवा त्रिविक्रम श्रीनिवास यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चित्रपटातील उर्वरित कलाकार आणि क्रूबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी नाही. त्रिविक्रम श्रीनिवास यांचा शेवटचा चित्रपट सुपरस्टार महेश बाबूसोबतचा 'गुंटूर कारम' होता. या चित्रपटात श्रीलीला मुख्य नायिका होती, जिने 'पुष्पा २' मध्ये 'किसिक' हे आयटम नंबर केलं होतं. 

टॅग्स :अल्लू अर्जुनसिनेमा