Join us

अरे हा तर वडापाव झाला..., ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं इतकं वजन, पाहून चाहतेही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 14:32 IST

Pushpa The Rule, Allu Arjun : या फोटोंमध्ये अल्लू वाढलेले केस आणि दाढीसह दिसतोय.पण सोबत त्याचं वजनही प्रचंड वाढलेले दिसतंय. इतकं की, त्याला पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा- द राइज’  सुपरडुपर हिट झाला. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘पुष्पा-द रूल’ (Pushpa The Rule ) या चित्रपटाची. ‘पुष्पा’साठी अल्लूनं प्रचंड मेहनत घेतली होती.  संपूर्ण चित्रपटात एक खांदा वर करुन चालणं किंवा डान्स करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी अल्लू अर्जुनने 2 वर्ष मेहनत घेतली. इतकी की,  खांदा वर करुन चालणं त्याच्या अंगाशी आलं. या चित्रपटानंतर त्याला खांदेदुखीनं घेरलं होतं. ‘पुष्पा 2’साठी सुद्धा अल्लू अर्जुन अशीच मेहनत घेतोय. या चित्रपटाचं शूटींग सुरू झालं आहे आणि या चित्रपटाच्या सेटवरचा अल्लूचा लुक लीक झाला आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानी याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अल्लू वाढलेले केस आणि दाढीसह दिसतोय.पण सोबत त्याचं वजनही प्रचंड वाढलेले दिसतंय. इतकं की, त्याला पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी यावरून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.

चाहते म्हणाले, वडापावअल्लू अर्जुनचा पुष्पा लुक पाहून काही चाहते क्रेझी झाले आहेत तर काहींनी मात्र त्याचं वाढलेलं वजन पाहून त्याला ट्रोल केलं आहे. अरे याचा तर वडापाव झाला, अशी कमेंट एका युजरने केली आहे तर काहींनी त्याला मोटा भाई म्हटलं आहे. काहींनी त्याला लसित मलिंगा म्हणत ट्रोल केलं आहे.

श्रीवल्लीचा होणार मृत्यू...?‘पुष्पा 2’ची कथा लिक झाली आहे. चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या भूमिकेतील अल्लू अर्जून   आणि श्रीवल्लीच्या भूमिकेतीज रश्मिकाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. दोघांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रत्येकाला भावली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ही केमिस्ट्री पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु, रिपोर्टनुसार, श्रीवल्लीच्या पात्राला दुसऱ्या भागात कमी सीन्स देण्यात आले असल्याची चर्चा  आहे. इतकंच नाही तर तिचा मृत्यू दाखवला जाईल. चित्रपटातील विलन (फहाद फासिल) हा श्रीवल्लीची हत्या करतो, असं दाखवलं जाईल आणि पुष्पा याचा बदला घेईल.  आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे माहित नाही. पण सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywood