Join us
Daily Top 2Weekly Top 5

झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:02 IST

'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यानच 'पुष्पा ३'च्या चर्चा रंगल्या होत्या. पण, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. अशातच आता खुद्द अल्लू अर्जुननेच याबाबत हिंट दिली आहे.

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करून सोडलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची क्रेझ आजही कायम आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सही प्रचंड व्हायरल झाले होते. 'पुष्पा' नंतर आता चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत आहेत. 'पुष्पा २'चं शूटिंग जोरदार सुरू असून अशातच अल्लू अर्जुनने एक खुशखबर चाहत्यांना दिली आहे. 

'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यानच 'पुष्पा ३'च्या चर्चा रंगल्या होत्या. पण, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. पण, चाहत्यांची 'पुष्पा ३'बाबतही उत्सुकता वाढत चालली होती. अशातच आता खुद्द अल्लू अर्जुननेच याबाबत हिंट दिली आहे. 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं अल्लू अर्जुन म्हणाला आहे. "या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अपेक्षा तुम्ही नक्कीच करू शकता. आम्हाला या सिनेमाचा फ्रेंचाइजी काढायची आहे. आणि यासाठी आमच्याकडे खूप छान कल्पनादेखील आहे. 'पु्ष्पा २'मध्ये खूप वेगळी भूमिका असणार आहे. पुष्पामध्ये ते तुम्ही पाहिलेलं नसेल." असं अल्लू अर्जुनने सांगितल्याचं व्हरायटीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. तसंच 'पुष्पा ३'देखील अॅक्शन आणि मनोरंजनने भरपूर असल्याचं त्याने सांगितलं. 

दरम्यान, 'पुष्पा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'पुष्पा २'च्या सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले होते.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पासिनेमा