Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्रीमुळे अल्लू अर्जुन-रामचरणमध्ये झालेला वाद, 18 वर्ष एकमेकांनी धरलेला अबोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:56 IST

South star: २००७ साली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

दाक्षिणात्य कलाविश्वातील दोन सुपरस्टार म्हणजे अल्लू अर्जुन (allu arjun) आणि राम चरण( ram charan).  आपल्या दमदार अभिनयामुळे या दोघांनीही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ते कायम चर्चेत येत असतात. साऊथ स्टार असलेले या दोन्ही कलाकारांमध्ये एका चांगलाच वाद रंगला होता. विशेष म्हणजे या वादामागे बॉलिवूड अभिनेत्री कारणीभूत होती. 

एका बॉलिवूड अभिनेत्रीमुळे सुरु झालेला हा वाद जवळपास १८ वर्ष सुरु राहिला. हे दोन्ही कलाकार १८ वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. २००७ साली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

'क्रूक' हा बॉलिवूड सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमात इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री नेहा शर्माने (neha sharma) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याच नेहा शर्मामुळेअल्लू अर्जुन-रामचरणमध्ये वाद झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि नेहा एकमेकांना डेट करत होते. मात्र, नेहाने रामचरणसोबत 'चिरुथा' या सिनेमात काम केल्यानंतर तिच्या आणि अल्लू अर्जुनच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं.

रामचरण- नेहाची वाढली जवळीक

चिरुथामध्ये काम करत असतांना नेहा आणि रामचरण यांची जवळीक वाढली. या गोष्टीची खबर अल्लू अर्जुनला लागली. त्यानंतर नेहावरुन अल्लू आणि रामचरण यांच्यात बरंच मोठं रामायण घडलं. परंतु, या वादानंतर दोन्ही कलाकारांनी एकमेकांशी संवाद करणं बंद केलं. दरम्यान, सध्याच्या घडीला या दोघांमधील वाद मिटला आहे. आता अनेक पार्टी, कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसून येतात. रामचरण हा साऊथ स्टार चिरंजीवी यांचा लेक आहे.  अल्लू आणि रामचरण हे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood actress fueled Allu Arjun-Ram Charan feud, 18-year silence.

Web Summary : A Bollywood actress sparked an 18-year feud between Allu Arjun and Ram Charan. The dispute began in 2007 over actress Neha Sharma, causing a communication breakdown until recently. They are cousins.
टॅग्स :Tollywoodअल्लू अर्जुनसेलिब्रिटीनेहा शर्मासिनेमा