Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे 'धुरंधर' मधील रेहमान डकैत! स्वत: च सांगितलेलं अविवाहित असण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:48 IST

...म्हणून अक्षय खन्नाने केलं नाही लग्न! त्या निर्णयाबद्दल धुरंधर फेम अभिनेता म्हणालेला-"मी मॅरेज मटेरिअल..."

Akshaye Khanna: सध्या हिंदी सिनेसृष्टीत आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (Dhurandhar) या अॅक्शन स्पाय थ्रिलर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सिनेमात रणवीरने हमजाची अप्रतिम भूमिका साकारली आहे. धुरंधर मधील संगीत, पार्श्वसंगीत, चित्रीकरण सगळं उत्तमरित्या जमून आलेलं आहे. त्यामुळे सिनेरसिकांची या चित्रपटाला दाद मिळते आहे. असं असतानाही या चित्रपटात भाव खाऊन गेलाय तो अक्षय खन्ना. धुरंधर मधली अक्षय खन्नाची ' वास्तववादी' भूमिका, त्याचा अफगाणी डान्स, त्याचा एकूण 'चार्म' सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर गाजतोय. पडद्यावर त्याने रेहमान डकैतचं पात्र जिवंत केलं आहे. एकेकाळी त्याच्या डॅशिंग पर्सनालिटी आणि लूक्सवर कित्येकजणी फिदा होत्या. मात्र, तुम्हाला माहितीये का? अक्षय खन्ना वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने अविवाहित असण्यामागचं कारण सांगितलं होतं.

एका मुलाखतीदरम्यान अक्षय खन्नाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार तो स्वतःला लग्नासाठी योग्य व्यक्ती म्हणून पाहत नाही. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत अक्षयने म्हटलं होतं की,"लग्न ही अशी गोष्ट आहे की सर्व काही बदलून टाकते. मला माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला आवडते. म्हणून, दुसरी कोणतीही व्यक्ती माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवल्याचं मला आवडत नाही."

मी मॅरेज मटेरियल नाही...

लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल अक्षय म्हणाला, "मी स्वत:ला विवाहित असलेलं पाहू शकत नाही. कारण, मला असं वाटतं की मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते पण यामुळे आपल्या जीवनशैलीत मोठे बदल होतात. मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवं असतं. पण जेव्हा तुम्ही एका पार्टनरसोबत आयुष्य घालवता तेव्हा तुमचा तुमच्या आयुष्यावर पूर्ण कंट्रोल नसतो. बऱ्याच प्रमाणात नियंत्रण सोडावं लागतं."

मूल दत्तक घेण्याबद्दल अक्षय काय म्हणालेला?

"मी त्यासाठी अजून तयार नाही. मला माझं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं नाही. ना लग्नासाठी, ना मुलांसाठी. अशा बदलांसाठी मी तयार नाही आणि कदाचित भविष्यातही नसेन."

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaye Khanna: Why the 'Dhurandhar' star is still single.

Web Summary : Akshaye Khanna, acclaimed for his role in 'Dhurandhar,' reveals he remains unmarried because he values control over his life. He doesn't see himself as 'marriage material,' preferring his independent lifestyle and not wanting to share it, even with children.
टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूडसिनेमा