Join us
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : मेहंदी रंगली गं ! सप्तपदी, आणि.. अक्षयाच्या मेहंदी सोहळ्याची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 10:28 IST

टीव्हीची सुपरहिट जोडी राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकत आहेत. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

टीव्हीची सुपरहिट जोडी राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकत आहेत. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. रोज त्यांच्या लग्नाच्या तयारीचे व्हिडिओ बघून चाहतेही फारच खुश झाले आहेत. हार्दिक आणि अक्षया ला 'वर वधू' च्या रुपात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच अक्षयाच्या मेहंदीचा सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खुपच पसंत केले आहे. असे काय आहे यात खास तर ती अक्षयाच्या हातावरची मेहंदी. 

अक्षयाने लग्नाच्या तयारीचे अपडेट्स सतत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता तिने मेहंदीचा व्हिडिओ टाकला आहे. चार जणी तिच्या हातावर मेहंदी काढत आहेत. मेहंदीची थीम खुपच अप्रतिम आहे. अक्षयाच्या हातावर सप्तपदी काढण्यात आले आहेत, लग्नाच्या वेळेसचे सात वचनं हातावर लिहिली आहेत. तसेच वर वधुसमोर गुडघ्यावर बसून तिला मागणी घालतो असे देखील काढण्यात आले आहे. तर दुसऱ्या हातावर हार्दिक-अक्षया असे नावही लिहिले आहे. या व्हिडिओ ला तिने तुझ्यात जीव रंगला चे टायटल सॉंग लावले आहे.

अक्षयाने सुरुवातीला शेअर केलेला mehendi vibes हा व्हिडिओ ही खुप सुंदर आहे. त्यात अक्षया फार आनंदी दिसत असून तिच्या अवतीभवती फुलांची सुंदर सजावट केलेली दिसते. अक्षया चा मेहंदीचा माहोल बघुन प्रेक्षकही खुश झालेत आणि तिला शुभेच्छा देत आहेत. मेहंदीचाच असा माहोल असेल तर लग्न किती धुमधडाक्यात होईल याचा विचार चाहते करत आहेत. 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतुन लोकप्रिय झालेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येतीये. राणादा आणि पाठकबाईची क्रेझ अजुन चाहत्यांमधुन कमी झालेली नाही. २ डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षयाचे लग्न असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीलग्नटिव्ही कलाकार