मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील एका कारचा भयंकर अपघात घडला. सोमवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. एका मर्सिडीज कारने रिक्षाला जोरात धडक दिली. रिक्षा वेगात जाऊन अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारवर जाऊन आदळली. सुदैवाने अपघात घडला त्यावेळी अक्षय कुमार पत्नीसोबत दुसऱ्या कारमध्ये बसलेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना सोबत दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. रिक्षा ताफ्यातील इनोव्हा कारला धडकली. त्यानंतर ही कारही अक्षय बसलेल्या कारवर आदळली. सुदैवाने अक्षय बसलेल्या कारचे थोडे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलिसांनी रिक्षाचालक आणि रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात कार आणि रिक्षाचा चुराडा झाला आहे. अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारच्या अपघातानंतरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अक्षय कुमार पत्नीसह मुंबई विमानतळावरुन घरी जात होता. त्याचवेळी ही घटना घडली असल्याची माहिती आहे.
Web Summary : A car in Akshay Kumar's convoy hit an auto-rickshaw in Juhu, Mumbai. Akshay and his wife Twinkle Khanna were in another car and are safe. The auto hit the Innova in the convoy, which then hit Akshay's car causing minor damage. No injuries were reported.
Web Summary : मुंबई के जुहू में अक्षय कुमार के काफिले की एक कार ने एक ऑटो-रिक्शा को टक्कर मार दी। अक्षय और उनकी पत्नी ट्विंकल खन्ना दूसरी कार में थे और सुरक्षित हैं। ऑटो ने काफिले में इनोवा को टक्कर मारी, जिसने फिर अक्षय की कार को टक्कर मार दी जिससे मामूली नुकसान हुआ। कोई चोट नहीं आई।