Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालननंतर 'भूल भुलैया ३'मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री? दिग्दर्शक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 09:06 IST

'भूल भुलैया ३'मध्ये विद्या बालनबरोबर अक्षय कुमारही दिसणार? दिग्दर्शकांनी स्पष्टच सांगितलं

२००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर २०२२ साली या सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. आता 'भूल भुलैया' ३ची चर्चा रंगली आहे. 'भूल भुलैया'च्या सिक्वलसाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. तर 'भूल भुलैया २'मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसला होता. 

'भूल भुलैया ३'मध्येही कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या सिक्वलमध्ये कार्तिकबरोबरच माँज्युलिका विद्या बालनची वर्णीही लागली आहे. आता या सिनेमात अक्षय कुमारही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता सिनेमाच्या दिग्दर्शकाने भाष्य केलं आहे. 'भूल भुलैया ३' या सिनेमाचं अनीस बज्मी दिग्दर्शन करणार आहेत. अनीस बज्मी यांनी अक्षय कुमारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

'भूल भुलैया ३'मध्ये अक्षय कुमार दिसणार की नाही? यावर त्यांनी भाष्य केलं. झूमला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "अक्षय कुमार या सिनेमात दिसणार नाही. यात फक्त कार्तिक आणि विद्या बालनच असणार आहेत. अक्षय कुमारबरोबरच तब्बूही या सिनेमात दिसणार नाही." 

पुढे ते म्हणाले, "मला अक्षय कुमारसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. पण, दुर्देवाने मी अशी स्क्रिप्ट लिहिलेली नाही ज्यामध्ये आम्हाला एकत्र काम करता येईल." १० मार्चपासून 'भूल भुलैया ३'चं शूटिंग सुरू होणार असून २०२४च्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारकार्तिक आर्यनविद्या बालन