Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सरफिरा' रिलीज होताच अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह, अंबानींच्या लग्नसोहळ्यालाही जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:28 IST

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानींनी अक्षय कुमारच्या घरी जाऊन त्याला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'सरफिरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलग चार फ्लॉप दिल्यानंतर आता अक्षयला या सिनेमाकडून अपेक्षा आहेत. आज सिनेमा रिलीज झाला असून प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र अक्षय सिनेमाच्या शेवटच्या काही प्रमोशन्सला हजेरी लावू शकणार नाही याचं मोठं कारण समोर आलं आहे.

अक्षय कुमार सध्या घरीच क्वॉरंटाईन झाला आहे. ना तो सिनेमाच्या प्रमोशनला जाणार आहे ना ही अनंत अंबानीच्या लग्नाला हजेरी लावू शकणार आहे. याचं कारण म्हणजे अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' ने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार काही दिवसांपासून प्रमोशनमध्ये व्यग्र होता. अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याच्या प्रमोशन टीममध्ये काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. म्हणूनच अक्षयनेही चाचणी केली. यात तो पॉझिटिव्ह आला आहे. आज (शुक्रवारी) सकाळीच तो पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे. यानंतर त्याने त्वरित स्वत:ला आयसोलेट केले. 

इतकंच नाही तर आज होणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नालाही अक्षय कुमारला हजेरी लावता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी स्वत: अक्षयला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. 

टॅग्स :अक्षय कुमारअनंत अंबानीकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड