Join us

अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:18 IST

अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावलची तिकडी पुन्हा पडद्यावर धमाल करायला येणार आहे.

अक्षय कुमार(Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि गोविंदा (Govinda) यांचा 'भागम भाग' (Bhagam Bhag) सिनेमा आठवतोय? २००६ साली आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रियदर्शन यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. सोशल मीडियावर सिनेमाचे अनेक मीम्स व्हायरल होतात. तिघांचे कॉमेडी सीन्स आजही धमाल करतात.   आता या सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. सिनेमाच्या सीक्वेलसाठी चाहते खूप आतुर आहेत. 

अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावलची तिकडी पुन्हा पडद्यावर धमाल करायला येणार आहे.  'भागम भाग अगेन' ची सध्या चर्चा सुरु आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, सरिता अश्विन वर्देंनी भागम भागचे हक्क विकत घेतले आहेत. शेमारु एंटरटेन्मेंटसोबत मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहे. अक्षय कुमारने आधीच हेरा फेरी आणि भागम भाग फ्रँचायझीमध्ये असणार हे निश्चित झाले आहे. लेखकांची नवी टीम स्क्रिप्टवर काम करत आहे. त्यामुळे लवकरच सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा होईल.

अक्षय कुमारला नुकतंच 'खेल खेल मे' कॉमेडी ड्रामामध्ये पाहिलं गेलं. याशिवाय त्याचा 'वेलकम टू जंगल','भूत बंगला' यामध्येही तो दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'भागम भाग 2' पुढील वर्षीच्या शेवटी किंवा २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारपरेश रावलगोविंदाबॉलिवूड