Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदत असावी...! मोदींचा अक्षयला चिमटा, ट्विंकलने दिले उत्तर !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 12:47 IST

अक्कीने मोदींना सोश्ल मीडियाशी निगडीत प्रश्नही विचारले. पण यातल्याच एका प्रश्नावर मोदी आपली ‘गुगली’ करतील, हे अक्कीलाही ठाऊक नसावे.

ठळक मुद्देमुलाखतीत मोदींनी घेतलेली फिरकी पाहून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने लगेच उत्तर दिले.

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘नॉन पॉलिटिकल’ ट्रेंड होतेय. अक्षयचे भन्नाट प्रश्न आणि त्यावरची पंतप्रधान मोदींची तितकीच भन्नाट उत्तरे, हा ‘सिलसिला’ जसाजसा पुढे गेला, तसतशी मुलाखत रंगू लागली. यावेळी अक्कीने मोदींना सोश्ल मीडियाशी निगडीत प्रश्नही विचारले. पण यातल्याच एका प्रश्नावर मोदी आपली ‘गुगली’ करतील, हे अक्कीलाही ठाऊक नसावे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता का? असा प्रश्न अक्कीने मोदींना विचारला. यावर मोदींनी भारी उत्तर दिले. त्यांनी चक्क अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाचा उल्लेख केला.

‘होय, मी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून असतो. मला यामुळे अनेक प्रकारची माहिती मिळते. मी तुमचे ट्विट्सही पाहतो,तसेच ट्विंकल खन्नाजींचेही ट्विट्स पाहतो. त्या माझ्यावर इतका राग काढतात की, कधी कधी मला वाटतं की, माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदव असावी. त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो आणि त्यामुळे तुम्हाला शांतता लाभते. एकप्रकारे यामाध्यमातून काही होईना, मी तुमच्या कामी येतो,’ असे मोदी हसत हसत म्हणाले. मोदींचे हे उत्तर ऐकून अक्षयही हसू रोखू शकला नाही. यावेळी मोदींनी ट्विंकलच्या आजोबांना भेटल्याचा एक किस्साही अक्षयला ऐकवला.

ट्विंकलने दिले उत्तर...

मुलाखतीत मोदींनी घेतलेली फिरकी पाहून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने लगेच उत्तर दिले. ‘मी याकडे (मोदींनी जे काही म्हटले त्याकडे) सकारात्मकदृष्टीने पाहू शकते. मी ट्विटरवर आहे, हे पंतप्रधानांना केवळ माहितच नाही तर ते माझे ट्विट्स वाचतातही...,’असे ट्विंकलने ट्विटरवर लिहिले.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नानरेंद्र मोदी