Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना 'पृथ्वीराज' सिनेमा दाखवणार का? अक्षय कुमारने दिलं मजेदार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:24 IST

Prithviraj : या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये क्रेझ निर्माण झाली आहे.

हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. नुकताच या सिनेमाच ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

एका ग्रॅन्ड इव्हेंटमध्ये नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी अक्षय कुमार याला विचारण्यात आले की, हा सिनेमा रिलीज झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवणार का? यावर उत्तर देत अक्षय कुमार म्हणाला की, मी काय दाखवणार. जर त्यांना बघायचा असेल तर ते स्वत: बघतील. मी कोण होतो त्यांना सिनेमा दाखवणारा. अक्षयच्या या उत्तरावर उपस्थित लोक हसले.

तसेच अक्षय कुमार म्हणाला की, या सिनेमाचा भाग झाल्याने तो स्वत:ला लकी मानतो. इतक्या मोठ्या योद्ध्यावर सिनेमा केल्याने अक्षय कुमार आनंदी आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मला या इंडस्ट्रीत ३० वर्षे झाली आहेत. इतका मोठा ऐतिहासिक सिनेमा मी कधी केला नाही. जेव्हा मला समजलं की इतकी मोठी भूमिका करायची आहे ती माझ्या ती गर्वाची बाब होती. असं वाटतंय जीवन सफल झालं. 

या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनातील दोन घटना दाखवल्या जाणार आहे. अक्षय कुमार त्यांची कथा पडद्यावर रेखाटणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर महत्वाच्या भूमिकेत आहे. संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही यात भूमिका आहेत. ३ जूनला हा सिनेमा रिलीज होत आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारनरेंद्र मोदीपृथ्‍वीराज