Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 10:34 IST

'अग्नी' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची कधीही न पाहिलेली कहाणी सिनेमात बघायला मिळणार आहे (agni)

बॉलिवूडमध्ये अनेक वेबसीरिज आल्या. त्यामध्ये अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांचं आयुष्य आपल्याला बघायला मिळालं.  पोलीस अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं ते दिसलं. पण बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांवर सिनेमा येणार आहे. या सिनेमाचंं नाव 'अग्नी'. प्राइम व्हिडीओने काल या नव्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केलाय. अग्निशमन दलातील अधिकाऱ्याचा दुःखाचा पट या सिनेमातून दिसणार आहे.

'अग्नी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय?

'अग्नी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, अग्नीशमन दलातील अधिकारी बिल्डिंगला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. पण अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आग विझवताना शौर्य, साहस दाखवण्यासोबतच अधिकाऱ्यांना बलिदानाला सामोरं जावं लागतं. याच अधिकाऱ्यांच्या वेदनेची कहाणी 'अग्नी'च्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. 

अग्नी कधी रिलीज होणार?

'अग्नी' हा सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडीओवर 'अग्नी' सिनेमा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठमोळे कलाकार अर्थात जितेंद्र जोशी आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका आहे. 'अग्नी'मध्ये प्रतीक गांधी, द्विवेंदू शर्मा, सय्यामी खेर या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. शाहरुखच्या रईस सिनेमाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी 'अग्नी'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ६ डिसेंबरला हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे

टॅग्स :जितेंद्र जोशीसई ताम्हणकरबॉलिवूडसंयमी खेर