Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंकज उधास यांच्या निधनानंतर सोनू निगमने व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'माझ्या बालपणीचा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 17:59 IST

गायक सोनू निगमला धक्का बसला असून त्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ गझलकार आणि पार्श्वगायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. ते कॅन्सरशी झुंज देत होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्व शोकसागरात बुडाले आहे. गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्का बसला असून त्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनू निगमने लिहिले, "माझ्या बालपणीचा सर्वात मोठा भाग आज हरपला. पंकज उधास जी, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुम्ही आज आमच्यात नाही हा विचार करुनच माझं मन भरुन आलं आहे. तुम्ही काय माझ्या पाठीशी होतात. ओम शांती."

पंकज उधास यांच्या निधनाने मनोरंजनविश्व शोकसागरात बुडाले आहे. सुरेश वाडकर, शंकर महादेवन अनुप जलोटा यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. 'चिठ्ठी आयी है','ना कजरे की धार' अशी अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली आहेत. दर्दी प्रेक्षकांचा हक्काचा गायक आज हरपला. पंकज उधास यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :सोनू निगमबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया