Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला दुसऱ्या पुरुषांशी बोलू द्यायचा नाही", लग्नानंतर ४ महिन्यांनी पतीने केले एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचे आरोप, अदिती म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:54 IST

अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचा आरोप केला आहे. अदितीचं सहकलाकार असलेल्या सामर्थ्य गुप्तासोबत अफेअर असल्याचं अभिनीतचं म्हणणं आहे. पतीच्या या आरोपांवर आता अदितीने प्रतिक्रिया दिली आहे.

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आली आहे. चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं होतं. मात्र आता तिचा घटस्फोट होत आहे. पती अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचा आरोप केला आहे. अदितीचं सहकलाकार असलेल्या सामर्थ्य गुप्तासोबत अफेअर असल्याचं अभिनीतचं म्हणणं आहे. पतीच्या या आरोपांवर आता अदितीने प्रतिक्रिया दिली आहे. 

अदितीने इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत पतीच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. "तो रोज माझ्यावर फसवल्याचे आरोप करायचा. सामर्थ्य आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मी कोणाशी बोलले, कोणाच्या मेसेजला रिप्लाय दिला किंवा कोणत्या दुसऱ्या मुलाकडे बघितलं जरी तरी त्याला कारण मिळायचं. मी रिप्लाय देताना हॉर्ट इमोजीचा वापर केला तरी भांडण व्हायचं. जेव्हा आम्ही काऊंन्सिलरकडे गेलो तेव्हा त्याने याला इनसिक्युरिटीचं नाव दिलं", असं अदितीने म्हटलं आहे. 

याबरोबरच अदितीने तिच्या पतीवर अनेक आरोपही केले आहेत. अभिनीत तिच्यावर नजर ठेवायचा असा खुलासाही तिने केला. ती म्हणाली, "माझ्या कारमध्ये एक ट्रॅकर लावलेला होता. त्याने माझ्यावर एअरटॅगही लावले होते. मला ते मिळाले पण, आता ते त्याने अनलिंक केले असणार. मी कोणत्याही पुरुषाशी बोलल्यावर त्याला प्रॉब्लेम व्हायचा. मी कोणत्या पुरुषाच्या शेजारी बसले तर मला त्यावरुन तो सुनवायचा. हा आमचा वैयक्तिक प्रश्न होता. मात्र, दुर्देवाने आता तसं राहिलेलं नाही". 

"जेव्हा एक स्त्री एवढ्या कमी वेळात घटस्फोट घेत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. घटस्फोटाकडे समाज वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो म्हणून एका स्त्रीने ते सगळं सहन करत राहिलं पाहिजे का? १०-१२ वर्ष त्रास सहन करून मगच महिलांनी याबद्दल बोललं पाहिजे का?", असंही अदितीने म्हणाली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट