Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदिती आणि सिद्धार्थ लवकरच अडकणारच लग्न बंधनात? अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:48 IST

अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. 

बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या डेटिंग, ब्रेकअप आणि लग्नाच्या बातम्या समोर येत असतात. सेलिब्रेटींच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. यातच बी टाऊनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन सेलिब्रेटींच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे जोडपं दुसरं कुणी नसून अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेंकाना डेट करत आहेत. 

अदिती आणि सिद्धार्थला अनेककदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण, या दोघांनी कधीही त्याच्या नात्याचा खुलासा केला नव्हता.  गेल्या अनेक काळापासून अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत आहेत. आता अखेर आदितीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आदितीने इंस्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.  

आदितीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आनंदी, धन्य आणि कृतज्ञ आहे. जादुई आनंद, प्रेम, हसू, युनिकॉर्न आणि  फेयरी डस्ट यासाठी धन्यवाद. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा'. आदिती आणि सिद्धार्थचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्या या गोड फोटोवर खूप कमेंट्स व लाइक्स येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'तुम्हाला आनंदी पाहून मला आनंद झालाायं. तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे, तो खूप चांगला माणूस आहे'. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 2024 मध्ये लग्न करू शकतात. अदिती आणि सिद्धार्थ 'महा समुद्रम' चित्रपटात एकत्र दिसले होते. आदितीने यापूर्वी अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते. गेल्या वर्षीच त्याने फॅशन डिझायनर मसाबासोबत दुसरे लग्न केले. 'रंग दे बसंती' या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला विशेष लोकप्रियता मिळाली.  तर अदिती ही लवकरच 'हीरामंडी' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा