Join us  

पहिला सिनेमा, मेंदूला जबरदस्त मार; मृत्युच्या दारातून परत आलीये काजोलची धाकटी बहीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:24 AM

Tanishaa mukerji: पहिल्याच सिनेमाच्यावेळी तनिषाचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातामुळे तनिषा जीवन-मृत्युची लढाई लढत होती.

बिग बॉस या वादग्रस्त शोच्या सातव्या पर्वातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे तनिषा मुखर्जी (tanishaa mukerji). कुटुंबाकडून तनिषाला अभिनयाचा वारसा मिळाला. मात्र, तिला म्हणावं तसं यश इंडस्ट्रीत मिळालं नाही. तनिषाने २००३ मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, पहिल्याच सिनेमाच्या सेटवर तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे ती जीवन-मृत्युची लढाई लढत होती. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने घडलेला प्रसंग सांगितला.

तनिषाने २००३ साली Sssshhh या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमाच्या सेटवर तनिषासोबत मोठा अपघात घडला होता ज्यामुळे तिचा ब्रेन डॅमेज झाला होता. या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असताना ती एका उंच टेकडीवरुन खाली पडली होती ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. इतकंच नाही तर सूजही आली होती. परंतु, मेकर्स आणि सिनेमाचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी ती दुखापत झालेली असतांनाही शुटिंग करत राहिली.

मेंदूला झाली गंभीर दुखापत

"माझ्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता. मी उंच टेकडीवरुन कोसळले होते. जवळपास १ वर्षभर मला EEG करावं लागत होतं. कारण, मेंदूला आलेली सूज कमी झालीये की नाही हे सतत तपासावं लागायचं. मला नॉर्मल होण्यासाठी साधारणपणे एक वर्षाचा काळ लागला. मी याविषयी कोणालाच काही सांगितलं नाही पण मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मी २ तास शूट करायचे आणि ३ तास झोपायचे. माझं शरीर इतकं थकायचं की २ तासाच्यावर मला शूट करता येत नव्हतं. मला चक्कर यायची किंवा मी बेशुद्ध पडायचे. मी प्रयत्न करुन सुद्धा मला जागं राहता येत नव्हतं. माझा मेंदू थकून जायचा", असं तनिषा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला सिनेमाचं शुटिंग करतांना खूप त्रास झाला पण प्रोड्युसर आणि सगळ्या टीमने मला खूप मदत केली. अपघातानंतर मी माझ्या कामात १०० टक्के देऊ शकत नव्हते. माझं वजन वाढलं होतं. एक्स्प्रेशन्सही मला नीट देता नव्हते."दरम्यान, Sssshhh हा सिनेमा हॉलिवूड मुव्ही स्क्रीमवरुन इंस्पार्डर आहे. या सिनेमात तनिषाव्यतिरिक्त करणनाथ आणि डिनो मोरिया यांनी स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाकाजोल