मराठी अभिनेत्री रसिका वाखरकर सध्या 'अशोक मा.मा' मालिकेत भैरवी या भूमिकेत दिसत आहे. नुकतंच रसिकाने चाहत्यांना गुडन्यूज दिली. तिचं लग्न ठरलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला. शुभांकर उंबरानी असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. दोघांचं अरेंज मॅरेज आहे. रसिकाने लग्न ठरल्याचं जेव्हा सेटवर अशोक मामांना जाऊन सांगितलं तेव्हा त्यांनी तिला काय सल्ला दिला वाचा
सेटवरही सर्वांसाठी सरप्राईजच होतं
'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत रसिका वाखारकर म्हणाली, "खरं तर मुलगा कोण आहे हे मालिकेतल्या कलाकारांना आणि सेटवर सगळ्यांनाच साखरपुड्यानंतर कळलं. तोपर्यंत त्यांनाही माहित नव्हतं. सगळ्यांनाच उत्सुकता होती. कलाकार, मेकअप आर्टिस्ट सगळ्यांनी मिळून केक आणला होता. आम्ही छोटंसं सेलीब्रेशन केलं. शुभांकर आत्ता इतक्यातच सेटवर आला होता. त्या दिवशी नेमका माझा प्रोमो शूट होता ज्यात मी अगदी गुंडांना मारते वगैरे असा तो सीन होता. तेव्हा दिग्दर्शक शुभांकरला म्हणाले की तू चुकीच्या दिवशी आला आहेस. नेमकं आजच तिचं दुर्गा रुप आहे. तोही म्हणाला की, 'मी तयारी करुन घेतो. आजच बघून घेतो."
अशोक मामांची अशी होती प्रतिक्रिया
अशोक मामांना कौतुक आणि आनंद वाटला. मी सर्वात आधी त्यांनाच साखरपुड्याबद्दल सांगितलं होतं. पहिली गोष्ट त्यांनी मला हीच विचारली की काम करणार आहेस ना? काम सोडायचं नाही. अर्थातच त्यांचीही इच्छा आहे की मी करिअर सुरु ठेवावं. सगळ्यांकडे ही कला नसते तुझ्याकडे आहे तर तू सोडू नको. हे मी तुला एक दोस्त म्हणून सांगत आहे. माझ्यासाठी तो क्षण खरोखर भावनिक होता. अजून त्यांची आणि शुभांकरची भेट झालेली नाही ती मी लवकरच घडवून आणणार आहे."