Join us

एक नंबर तुझी कंबर! 'पारु' मालिकेतील खलनायिकेने धरला ठेका; सुंदर लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:33 IST

'पारु' मालिकेत दिशा या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री, तिचं रील पाहिलंत का?

संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' या व्हायरल गाण्याची क्रेझ अजून काही कमी झालेली नाही. सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींमध्येही या गाण्याची क्रेझ आहे. मराठीच नाही तर हिंदी सेलिब्रिटीही यावर रील करताना दिसत आहे. मराठी मालिकांमधील तर जवळपास सर्वच नायिकांनी रील बनवलं आहे. आता 'पारु' या गाजत असलेल्या मालिकेतील खलनायिकेनेही 'एक नंबर तुझी कंबर'वर ठेका धरला आहे.

'पारु' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे  (Purva Shinde) ही दिशा या खलनायिकेच्या भूमिकेत आहे. पूर्वा सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. लाल रंगाची साडी, गळ्यात सुंदर मोत्यांचा हार, बांगड्या, कमरपट्टा, केसांचा अंबाडा अशा मनमोहक लूकमध्ये ती 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'बेटर लेट दॅन नेव्हर' असं तिने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.

पूर्वाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी 'आवडत्या खलनायिकांपैकी एक', 'गोडुली दिसतेस गं राणी',' तू खूप भारी डान्सर आहेस', 'माझी आवडती अभिनेत्री अशा कमेंट्स केल्या आहेत. 

सध्या पूर्वा झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. तिने 'लागीरं झालं जी' या मालिकेत जयडी ही ग्रे शेड भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. याशिवाय तिने 'जीव माझा गुंतला' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. या मालिकेत तिने श्वेता हे पात्र साकारलं होतं

टॅग्स :पूर्वा शिंदेमराठी अभिनेताव्हायरल व्हिडिओटेलिव्हिजन