मनोरंजनविश्वात कधी काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही. अनेक जोडप्यांच्या वयातील अंतराबद्दल ऐकून तर धक्काच बसतो. पण आता नुकतंच एका अभिनेत्रीच्या आजे सासऱ्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी लग्न केलं आहे. यात काय? असं तुम्ही म्हणाल पण त्यांनी जिच्याशी लग्न केलंय ती केवळ २१ वर्षांची तरुणी आहे. होय धक्का बसला ना? कोण आहे ती अभिनेत्री आणि कोण आहेत तिचे हे आजे सासरे वाचा.
ही अभिनेत्री आहे मावरा होकेन (Mawra Hocane). मावरा मूळची पाकिस्तानची आहे. २०१६ साली तिने 'सनम तेरी कसम' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हा सिनेमा नुकताच रि रिलीज झाला असून आता बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे मावराने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये लग्नगाठ बांधली. तिच्या नवऱ्याचं नाव अमीर गिलानी (Amir Gilani) आहे आणि तो तेथील राजकीय कुटुंबातला आहे. तो पाकिस्तानमधील नावाजलेला वकील आहे. तसंच माजी मंत्री सैय्यद इफ्तिकार हुसैन गिलानी (Syed Iftikhar Hussain Gilani) यांचा नातू आहे.
हेच सैय्यद इफ्तिकार हुसैन गिलानी जे आता मावराचे आजे सासरे आहेत त्यांनी २०२१ साली एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न केलं होतं. तेव्हा त्यांचं वय ८० वर्ष होतं. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. तसंच त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. याच कुटुंबात आता मावरा होकेन सून म्हणून गेली आहे. तसंच तिचे आजे सासरे आजही तरुणीसोबत संसार करत आहेत.
मावरा होकेन २०१३ साली पाकिस्तानी ड्रामामधून करिअरला सुरुवात केली. २०१६ साली तिला थेट बॉलिवूड सिनेमात लीड रोल मिळाला. तेव्हा सिनेमा फारसा चालला नव्हता. नंतर तो इतर प्लॅटफॉर्म्सवर आल्यावर सोशल मीडियावर झालेल्या चर्चांनंतर हिट झाला. मात्र नंतर मावराने एकाही हिंदी सिनेमात काम केलं नाही.