Join us

'सिद्धार्थच्या निधनाच्या एक दिवस आधीच आम्ही...', माही विजने आता केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:48 IST

अभिनेत्री माही विजने नुकतीच एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाची आठवण सांगितली.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla)  2021 साली हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झालं. आजही चाहते त्याची आठवण काढतात. नुकतंच अभिनेत्री माही विजने (Mahi Vij) सिद्धार्थसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगितली. माही सिद्धार्थसोबत खतरो के खिलाडी मध्ये होती. सिद्धार्थच्या निधनाच्या एक दिवस आधी ती त्याला भेटली होती. नुकतंच एका मुलाखतीत माही हे सांगताना भावूक झाली.

'खतरो के खिलाडी' या सेटवर सिद्धार्थ हाच माझा मित्र होता असं तिने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. दोघं सोबत फिरायचे, पार्टी करायचे. फिल्मज्ञानला दिलेल्या मुलाखतीत माही विज म्हणाली, "मी सिद्धार्थला आदल्या दिवशीच भेटले होते. तो काहीतरी सामान घेण्यासाठी बाहेर आला होता आणि मी वॉक करत होते. मोटी, तू कितीही चाल तुझं वजन कमी होणार नाही असं म्हणत त्याने मला चिडवलं. याच्या पुढच्याच दिवशी मी त्याच्या निधनाची बातमी ऐकली आणि मला विश्वासच बसेना."

ती पुढे म्हणाली, "मी धक्क्यात होते. जिममधून आल्यावर मला याबद्दल कळलं. असं होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. एक दिवस आधीच तर मी भेटले होते. आम्ही मागच्या रस्त्यावर उभं राहून बोलत होतो आणि तो मला चिडवत होता. त्याचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. त्यांच्यासाठी या धक्क्यातून सावरणं कठीण आहे."

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यूसिद्धार्थ शुक्ला