Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लिंबू कलरची साडी अशोकमुळे फेमस झाली...", अश्विनी भावेंनी अशोक मामांना दिलं क्रेडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:42 IST

Ashwini bhave: अश्विनी भावे यांनी त्यांच्या लिंबू कलरच्या साडीवर मांडलेलं मत पाहून प्रेक्षकांचा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीत तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा सिनेमा रिलीज होऊन आज अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आज सुद्धा हा सिनेमा प्रेक्षक तितक्याच उत्साहात बघतात आणि एन्जॉय करतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात झळकले. त्यातलीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे (ashwini bhave). या सिनेमातील त्यांच्या अभिनयासोबतच त्यांची लिंबू कलरची साडी सुद्धा तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या साडीच्या सीनचं सगळं क्रेडिट त्यांनी अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांना दिलं आहे.

अश्विनी भावे यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाविषयी भाष्य केलं होतं. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणि अन्य कलाकारांविषयी त्यांची मत मांडली होती. अश्विनी भावे यांनी त्यांच्या लिंबू कलरच्या साडीवर मांडलेलं मत पाहून प्रेक्षकांचा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे.

अश्विनी भावेंनी अशोक मामांना दिलं क्रेडिट

"या चित्रपटामध्ये तीन पिढ्यांना सातत्याने एंटरटेन करण्याची ताकद आहे. असा योग जुळून येणं, अशी भट्टी जमणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. माझी व्यक्तिरेखा आणि लिंबू कलर फक्त अशोक सराफमुळे लोकप्रिय झालाय. म्हणजे मला नाही वाटत की मी त्या पेसने ते डायलॉगसुद्धा आता बोलू शकेल. काय होतं ना... या चित्रपटामध्ये माझी भूमिका एवढीशी आहे," असं अश्विनी म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "या चित्रपटात चार मुख्य नायिका त्यातली मी एक. याशिवाय सचिन आणि लक्ष्या यांनीही स्त्रीपात्र केली आहेत. आणि सचिन सगळ्यात सुंदर स्त्री पात्र आहे त्या सिनेमातलं. म्हणजे आम्ही त्याच्यासोबत स्पर्धाच करु शकत नाही. तर असं असताना माझ्या वाट्याला किती क्षण यावेत. मला कधीकधी इतकं प्रेम स्वीकारायला खूप अवघडल्यासारखं वाटतं. हे बनवताना असं ठरवून बनवलेलं नव्हतं. पण ते होणार होतं अन् ते झालं." 

दरम्यान, या सिनेमात अश्विनी यांनी अशोक सराफ काम करत असलेल्या दुकानाच्या मालकिनीची म्हणजेच माधुरी मॅडमची भूमिका साकारली आहे. माधुरी मॅडम, धनंजय माने आणि लिंबू कलर या गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ashwini Bhave credits Ashok Saraf for saree's fame in movie

Web Summary : Ashwini Bhave attributed the popularity of her lime-colored saree in 'Ashi Hi Banwa Banwi' to Ashok Saraf's influence. She acknowledged his contribution to making the saree and her character memorable, emphasizing the film's enduring appeal across generations.
टॅग्स :अश्विनी भावेअशोक सराफसिनेमासेलिब्रिटीअशी ही बनवाबनवी