Join us

"मला छावा सिनेमा करायचा नव्हता कारण.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला-

By देवेंद्र जाधव | Updated: March 12, 2025 16:23 IST

'छावा' सिनेमात कवी कलशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सिनेमाविषयी खुलासा केला. विनीतला का करायचा नव्हता सिनेमा? (chhaava)

'छावा' सिनेमातील (chhaava movie) प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेमात छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं (vicky kaushal) कौतुक झालं. शिवाय शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजांना मित्रत्वाची साथ देणाऱ्या कवी कलश यांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली. विनीत कुमार सिंगने (vineet kumar singh) ही भूमिका साकारली. विनीतला 'छावा' सिनेमा करायचा नव्हता, काय होतं त्यामागचं कारण.

विनीतला लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं की,  "मी लक्ष्मण सरांना धन्यवाद म्हणेन की त्यांनी मला ही संधी दिली. माझं या सिनेमासाठी ऑडिशन झालं नव्हतं. कवी कलशजींच्या भूमिकेत मी फक्त तुम्हाला बघतोय, असं लक्ष्मण सर मला म्हणाले होते. माझ्याकडे एकही फोटो नव्हता जो कवी कलशजींच्या व्यक्तिमत्वाला मिळताजुळता असेल. माझं मन थोडंसं तळ्यात मळ्यात होतं." 

"कारण याआधी माझ्या पाठीला इजा झाली होती. एका दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती इजा झाली होती. या दुखण्यातून मी सावरत होतो पण १००% बरा झालो नव्हतो. खूप छोटंसं दुखणं होतं पण त्यामुळे मी वाकू शकत नव्हतो. मी सकाळी ब्रश करायतो तेव्हा मला वाकता यायचं नाही. मुंबईतील रस्त्यांवर गाडी खड्ड्यात उडाली तर मी घट्ट धरुन बसायचो. पण दिग्दर्शकाने माझ्यावर विश्वास ठेवला."

"सिनेमात खूप सारे अॅक्शन सीन्स होते. त्यामुळे एखादा अॅक्शन सीन करताना हे दुखणं वाढेल आणि माझ्यामुळे सर्व थांबेल, हे मला नको होतं. माझ्यामुळे एखाद्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला, सहकलाकाराला नुकसान होईल, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे थोडी भीती होती. पण माझी पत्नी रुचिरा आणि बहीण मुक्ती मला म्हणाली की, आम्ही तुला प्रचंड शारीरिक त्रासातही काम करताना बघितलंय. त्यांनी मला प्रोत्साहन दिल्याने मी देवाचं नाव घेऊन छावाच्या तयारीला लागलो."

टॅग्स :विनीत कुमार सिंह'छावा' चित्रपटबॉलिवूड