Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पत्नी ऑपरेशन टेबलवर होती अन् चाहता म्हणाला एक जोक...' सतीश शाह यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 10:02 IST

खऱ्या आयुष्यात कलाकार नक्की कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचं भान अनेकदा चाहत्यांना राहत नाही.

हिंदी सिनेमात विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते सतीश शहा (Satish Shah) यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पण पडद्यावरील आयुष्य आणि वास्तविक आयुष्य यात फरक असतो हे चाहत्यांना अनेकदा समजत नाही. खऱ्या आयुष्यात कलाकार नक्की कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचं भान अनेकदा चाहत्यांना राहत नाही. अशाच एका चाहत्याचा अनुभव सतीश शहा यांनी नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.

सतीश शहा यांनी सिनेमांमध्ये सर्वात जास्त विनोदी भूमिकाच केल्या आहेत. त्यामुळे चाहते त्यांच्याकडे त्याचनजरेने बघतात. त्यांना वाटतं अभिनेता खऱ्या आयुष्यातही असाच विनोदी असेल. एका मुलाखतीत सतीश शहा म्हणाले, 'गंभीर परिस्थितीतही आपण विनोदी असावं अशी लोकांची अपेक्षा असते. असं होतं. पण तुम्हाला ते स्वीकारावं लागतं. माझी पत्नी रुग्णालयात होती. ऑपरेशन टेबलवर ती अक्षरश: मरायला टेकली होती. मी खूप चिंतेत होतो. माझ्या लग्नाला तेव्हा तीन महिनेच झाले होते. मी ऑपरेशन थिएटरबाहेर बसलो होतो. इतक्यात एक व्यक्ती माझ्या बाजूला आला आणि मला म्हणाला, काय यार असा गंभीर बसलाय. असा चांगला नाही दिसत. एखादा जोक वोक मार.'

ते पुढे म्हणाले, 'जोक तर सोडाच मला त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली मारुन त्याला बेशुद्ध करण्याची इच्छा झाली होती. पण मी समजुतदारपणा दाखवला आणि शांतपणे तिथून दूर गेलो.'

सतीश शहा यांच्या पत्नीचं नाव मधु आहे. 1972 मध्ये त्यांचं लग्न झालं. सतीश शहा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे केले. 'हम आपके है कौन,'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे','जुडवा','मै हु ना' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. तसंच 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. आता ते आगामी 'डंकी' सिनेमात दिसणार आहेत.

टॅग्स :सतिश शहाटिव्ही कलाकारबॉलिवूड