Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:31 IST

'सिंघम अगेन' सिनेमाबद्दल नाना पाटेकरांनी रोहित शेट्टीला काय सांगितलं? याचा खुलासा करण्यात आलाय

रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. अजय देवगण सिनेमात पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसला असून त्यासोबत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करिना कपूर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर अशा कलाकारांची फौज आहे. मल्टिस्टारर असलेल्या या सिनेमाबद्दल नाना पाटेकर यांनी त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलंय.

सिंघम अगेनबद्दल नाना काय म्हणाले?

अमूक तमूक या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत  नाना म्हणाले,  "'सिंघम 3' रिलीज झाला. खूप चांगला चाललाय. पैसे वगैरे कमावले आहेत. मी रोहितला अगदी त्याच्या वडिलांपासून ओळखतो. तो लहान असल्यापासून. रोहित स्वतःच्या हिंमतीवर पोहोचलेला आहे. मी तो सिनेमा पाहिलेला नाहीये. पण तो लागताना मी स्टारकास्ट पाहिली. सिनेमातला जो मेन कॅरेक्टर आहे बाजीराव सिंघम. तो इतका छान आहे. ती व्यक्तिरेखा खूप सकस आहे.  तर तुला बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची गरज नव्हती. हाही पाहिजे, तोही पाहिजे."

नाना पुढे म्हणाले, "सुंदर कथानक होतं सिंघमचं. आम्ही पहिला सिनेमा दोन-तीन वेळा पाहिलाय. तर तुझा कॉन्फिडन्स गेलाय का? त्याचं हे द्याेतक आहे का? घे पुन्हा कर. पडलास एकदा तरी तू काही संपत नाहीस ना. अपयशाची भीती वाटायला लागते तेव्हा अपयश मागे लागतं तुमच्या. तुम्ही घाबरलात की पकडतं तुम्हाला. त्यामुळे मी रोहितला जाणीवपूर्वक फोन करुन सांगितलं. बाकीच्या कोणाबद्दल नाही पण मला रोहित हा माझा वाटतो."

टॅग्स :नाना पाटेकररोहित शेट्टीअजय देवगणअक्षय कुमार