Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' अभिनेत्री होती आस्ताद काळेचं पहिलं प्रेम; तिच्या मृत्यूनंतर स्वप्नालीने दिला अभिनेत्याला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 12:38 IST

Astad kale: स्वप्नालीपूर्वी आस्ताद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला डेट करत होता. परंतु, या अभिनेत्रीचा कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

आपल्या दमदार अभिनयशैली आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आजवरच्या कारकिर्दीत आस्तादने अनेक मालिकांमध्ये काम केलं. मात्र, 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. इतकंच नाही तर या शोमध्ये त्याच्या खिलाडीवृत्ती, गेम खेळताना लढवलेली युक्ती यामुळे तो विशेष चर्चेत राहिला. त्याच आस्तादचा आज वाढदिवस असून सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा रंगली आहे. यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा होतीये.

आस्ताद काळने अभिनेत्री स्वप्नाली पाटील हिच्यासोबत लग्न केलं आहे. जवळपास 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, स्वप्नालीपूर्वी आस्ताद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला डेट करत होता. परंतु, या अभिनेत्रीचा कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

आस्तादने 2021 मध्ये स्वप्नाली पाटीलसोबत लग्न केलं. त्यापूर्वी तो अभिनेत्री प्राची मते हिला डेट करत होता. प्राची आणि आस्ताद यांनी 'अग्निहोत्र' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या मालिकेत प्राचीने मंदिरा ही भूमिका साकारली होती.अग्निहोत्र मालिका सुरु असतानाच प्राची हिची तब्येत अचानक खालावू लागली. परिणामी, तिने अभिनय करणं सोडून दिलं. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीला कॅन्सरचं निदान झालं. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर झाला होता. परंतु, ज्यावेळी तिचं निदान झालं त्यावेळी ती कॅन्सरच्या लास्ट टप्प्यात होती. परिणामी, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्राचीच्या निधनामुळे आस्तादला प्रचंड धक्का बसला होता. जवळपास, ५ वर्ष तो या दु:खात होता. त्यानंतर ५ वर्षांनी पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर त्याची स्वप्नाली पाटीलसोबत ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर ३ वर्षांनी त्यांनी लग्न केलं. 

टॅग्स :अस्ताद काळेस्वप्नाली पाटीलसेलिब्रिटीटेलिव्हिजन