गेल्या काही वर्षात अनेक टीव्ही कलाकारांनी घटस्फोट घेतला आहे. जेनिफर-करण सिंह ग्रोवर, आमिर अली-संजीदा शेख, राकेश बापट-रिद्धी डोगरा यासह बरेच सेलिब्रिटी विभक्त झाले आहेत. तर यापैकी काहींना आयुष्यात नवं प्रेम मिळालं आहे. टीव्हीवरचा आमिर म्हणजे आमिर अली (Aamir Ali) पुन्हा प्रेमात पडला आहे. संजीदा शेखसोबत घटस्फोटानंतर आता तो अंकिता कुकरेतीला (Ankita Kukreti )डेट करत आहे. काल धुलिवंदनाला आमिर आणि अंकिताचा रंग खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आमिर अलीने काही महिन्यांपूर्वीच रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. आता त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा समोर आला आहे. अंकिता कुकरेती ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. आमिर दिसायला सुंदर अशा अंकिताच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. काल होळी पार्टीत या कपलचे व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये आमिर अंकिताला रंग लावताना दिसला. अंकिताने ब्लॅक शॉर्ट्स आणि जॅकेट घातलेलं दिसत आहे. तर आमिर ग्रे रंगाच्या कॅज्युअलमध्ये दिसतोय. आमिर ज्याप्रकारे अंकिताच्या खांद्यावर आणि मग छातीवर रंग लावतोय ते पाहून आता त्याला ट्रोलही केलं जात आहे. तसंच यावेळी दोघंही रोमँटिक झाल्याचंही दिसून येत आहे.
कोण आहे अंकिता कुकरेती?
अंकिता कुकरेती मॉडेल आहे. अभिनय क्षेत्रात ती नशीब आजमावत आहे. सलमान खान, सोनू सूद आणि हृतिक रोशनसोबत ती जाहिरातीत दिसली आहे. काही म्युझिक व्हिडिओंमध्ये ती झळकली आहे.
आमिर अली गेल्या वर्षी 'डॉक्टर्स', 'लुटेरे' या सीरिजमध्ये दिसला. तसंच २०२३ मध्ये त्याने काजोलच्या 'द ट्रायल' या सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. आमिरला 'FIR' मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती. २०१२ साली आमिर आणि संजिदा शेख यांचा निकाह झाला होता. जवळपास १० वर्ष एक्र राहिल्यानंतर दोघांनी २०११ मध्ये घटस्फोट घेतला. २०१८ मध्ये त्यांना सरोगसीद्वारे एक मुलगीही झाली. तिची कस्टडी संजिदाकडे आहे.