Join us
Daily Top 2Weekly Top 5

16 वर्षांपासून ऐश्वर्याच्या 'या' सवयीमुळे अभिषेक त्रस्त; वारंवार सांगूनही अभिनेत्रीत झाला नाही बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 10:26 IST

Abhishek bachchan: पहिल्यांदाच अभिषेकने ऐश्वर्याची खटकणारी गोष्ट सांगितली.

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे ऐश्वर्या राय (aishwarya-rai) आणि अभिषेक बच्चन(Abhishek bachchan). या जोडीच्या लग्नाला जवळपास १६ वर्ष झाली असून आजही ते नेटाने संसार करत आहेत. त्यामुळेच बॉलिवूडमधील 'Ideal Couple' म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु, संसार म्हटलं की, प्रेम, तक्रार, मतभेद हे सारं आलंच. सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्या यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याची न आवडणारी गोष्ट कोणती ते सांगितलं आहे.

ऐश्वर्याची अशी एक सवय आहे जी अभिषेकला जराही आवडत नाही. विशेष म्हणजे ऐश्वर्याला वारंवार सांगूनही तिच्या सवयीमध्ये कोणतीच सुधारणा होत नाही. त्यामुळे अभिषेकने तिची खटणाऱ्या गोष्टीविषयी भाष्य केलं आहे.अभिषेक आणि त्याची बहीण श्वेता बच्चन नंदा यांनी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने ऐश्वर्याची खटकणारी गोष्टी सांगितली.

'ऐश्वर्या ज्याप्रमाणे बाहेर जातांना एखादी बॅग पॅक करते तिची ती पद्धत मला अजिबात आवडत नाही. ती नीट बॅग पॅक करत नाही. पण, मला ते सहन करावं लागतं', असं अभिषेकने सांगितलं. दरम्यान, या कार्यक्रमात श्वेता बच्चन नंदा हिनेही ऐश्वर्याची खटकणारी गोष्ट कोणती ते सांगितलं. सध्या कॉफी विथ करण हा कार्यक्रम पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी अनेक गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत.

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा