Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस' करावसं का वाटलं? अभिजीत सावंतने एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:08 IST

'बिग बॉस' करावसं का वाटलं? अभिजीत सावंतने एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला- "हिंदीपेक्षा मराठीमध्ये..."

Abhijeet Sawant: इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकल्यानंतर मराठमोळा गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) नावारुपाला आला. आपल्या सुमधुर आवाजाने त्याने अनेकांच्या मनावर मोहिनी घातली. अलिकडेच अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वात देखील सहभागी झाला होता. आपल्या दमदार खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिजीत या पर्वाचा उपविजेता ठरला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिजीत सावंतने त्याचा बिग बॉस मराठीचा प्रवास कसा राहिला तसेच अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

नुकतीच अभिजीत सावंतने 'सावनी म्युझिक पॉडकास्ट'मध्ये हजेरी लावली. 'बिग बॉस'मध्ये घडणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा त्याने सावनी रविंद्रला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 'बिग बॉस' करावासा का वाटला?त्याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, "मला नवीन गोष्टी करायला आवडतात. हिंदीपेक्षा मराठी बिग बॉस बरं आहे म्हणून मी तिथे गेलो. एक गायक म्हणून माझा आवाज अजूनही रिकव्हर झालेला नाही. बिग बॉसमध्ये असताना जेव्हा मी भांडायचो तेव्हा मी मध्येच कुठेतरी गायब व्हायचो. कारण मी मोठ्याने बोलूच शकत नव्हतो. खरं तर ही आतली गोष्ट आहे पण भांडणामुळे मला ओरडायला लागायचं. त्यामुळे मी मधूनच गायब व्हायचो, कधी कधी पाणी पिऊन परत यायचो."

कुठल्याही रिअ‍ॅलिटी शोचे विनर नंतर दिसेनासे होतात...

या सांगताना अभिजीतने म्हटलं, "मला भरपूर लोकं येऊन विचारतात अरे, तुम्ही आता गात नाही का? आजही सर सुखाची श्रावणी गाणे ट्रेंडला आहे. पण, हेच गाणं हिंदीमध्ये असतं तर अजून १० गाणी मिळाली असती. माझ्याबाबतीत असं घडलंय की ज्याच्याकडे काम मागायला जायचो त्याच्याकडेच गर्दी असायची. अनेकदा मला असंही सांगण्यात आलं आहे की, तुझा आवाज थोडा हिंदी साऊंड करतोय आणि मराठीत काम करताना ते लोक म्हणायचे तुझा आवाज हिंदी साऊंड करतोय." असा खुलासा त्याने केला.

टॅग्स :अभिजीत सावंतटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी