Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:24 IST

'आश्रम ३ पार्ट २' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाबा निराला आणि पम्मी आमनेसामने येणार आहेत (aashram 3)

'आश्रम ३ पार्ट २'ची (aashram 3 part 2) सध्या चांगलीच चर्चा आहे. बॉबी देओल (bobby deol) पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी 'आश्रम ३ पार्ट २'ची अधिकृत घोषणा करण्यात आली. लॉर्ड बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे. काही दिवसांपूर्वी 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर आला. नुकतंच 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

'आश्रम ३ पार्ट २'च्या ट्रेलरमध्ये काय?

बॉबी देओलची भूमिका असलेला 'आश्रम ३ पार्ट २'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, बॉबी देओल निराला बाबाच्या भूमिकेत दिसतोय. बाबा निराला अध्यात्माच्या नावाखाली पुन्हा एकदा आश्रमात काळे धंदे करताना दिसतोय. याच आश्रमात पम्मी पुन्हा येते. बाबा निरालाचा पर्दाफाश करण्याचा पम्मीचा डाव असतो. त्यामुळे ती बाबाचा सहाय्यक भोपा स्वामीचा विश्वास जिंकते. त्यामुळे पम्मी आणि भोपा स्वामी हे दोघं मिळून निराला बाबाला त्यांच्या जाळ्यात कसं अडकवणार, याची कहाणी  'आश्रम ३ पार्ट २'च्या ट्रेलरमध्ये दिसणार आहे.

कधी आणि कुठे बघाल  'आश्रम ३ पार्ट २'

आधीच्या सर्व सीझनप्रमाणे 'आश्रम ३ पार्ट २' वेबसीरिज प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलीय. या सीरिजमध्ये बॉबी देओल, आदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, विक्रम कोचर, अनुप्रिया गोयनका, राजीव सिद्धार्थ आणि ईशा गुप्ता यांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. २७ फेब्रुवारी २०२५ ला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एम एक्स प्लेअर आणि प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज पाहायला मिळणार आहे.

 

टॅग्स :बॉबी देओलआश्रम चॅप्टर २बॉलिवूडवेबसीरिज