Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने दिलीप कुमारांच्या घरी केलं नववर्षाचं स्वागत, सायरा बानो यांनी शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 10:57 IST

सायरा बानो यांच्या पायाजवळ बसून आमिर खानने दिलीप कुमार यांच्या आठवणी केल्या ताज्या

भारतीय सिनेमातील दिग्गज कलाकारांमध्ये परफेक्शनिस्ट आमिर खानचं (Aamir Khan) नावही येतं. त्याने आपल्या अनेक भूमिकांमधून आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आमिर खानने खऱ्या आयुष्यात खूपच साधा सरळ आहे. नवीन वर्षाचं स्वागत त्याने दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरी सायरा बानो (Saira Banu) यांच्यासोबत साजरे केले. यावेळी आमिर जमिनीवर सायरा बानो यांच्या पायाजवळ बसलेला दिसला. आमिरच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचा आमिर खान मोठा चाहता आहे. आज दिलीप कुमार या जगात नाहीत पण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेकदा कलाकार सायरा बानो यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतात. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सायरा बानो यांनी त्यांची सेवा केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही आमिर खान दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची आई, बहीण आणि एक्स वाईफ किरण रावही होते. सायरा बानो यांनी स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यांनी आमिर खानचं खूप कौतुकही केलं आहे. त्या म्हणतात, "दिलीप कुमार यांच्या निधनानंतर आमिर खानने प्रत्येक सुखदु:खात त्यांना साथ दिली. दिलीप कुमार यांच्यावरील 'द सब्सटंस एंड द शॅडो' या आत्मकथेच्या तयारीतही आमिर खानने त्यांना पूर्ण सहकार्य केलं. ग्लॅमरच्या जगापासून दूर आमिर खानचं हेच वेगळेपण आपलंसं करुन जातं."

आमिर खानची लेक आयरा खान आज लग्नबंधनात अडकत आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखारेसोबत ती रजिस्टर मॅरेज करणार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमिर खान चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या न्यू इयर सेलिब्रेशनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'आमिर खूपच चांगला माणूस आहे. मोठ्या व्यक्तीच्या पायाजवळ बसून तो आदर दाखवत आहे जे कौतुकास्पद आहे' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 

टॅग्स :आमिर खानसायरा बानूबॉलिवूडदिलीप कुमारनववर्ष