Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संस्कारी लडकी ने दिल पें डाला डाका..'; 'चंदू चॅम्पियन'मधील गाण्यावर मधुराणीचं भन्नाट रील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:16 IST

Madhurani gokhale: सध्या नेटकऱ्यांमध्ये मधुराणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीमध्ये तिने चक्क 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील गाण्यावर रील शेअर केलं आहे.

छोट्या पडद्यावर 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अरुंधती ही  भूमिका साकारुन प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्थान मिळवलं. गेल्या काही काळात मधुराणीचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे. त्यामुळे अधेमधे ती व्हायरल होणारे ट्रेंड फॉलो करत असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये मधुराणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीमध्ये तिने चक्क 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील गाण्यावर रील शेअर केलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा नवा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

मधुराणीने साडी नेसून छान व्हिडीओशूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने चंदू चॅम्पियन या सिनेमातील 'एक संस्कारी लडकी ने दिल पें डाला डाका' हे गाणं बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा ट्रेंडिंग गाण्यावरील व्हिडीओ पाहून चाहते खुश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनमधुराणी प्रभुलकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकार