Join us

'दिल मेरा धडका दिया'; सिव्हलेस ब्लाऊज अन् सिल्कची साडी, मधुराणीचं कमाल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 17:47 IST

Madhurani gokhale: मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने क्रिम कलरची सिल्कची साडी नेसली असून त्यावर गडद मरुन रंगाचं सिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे.

'आई कुठे काय करते'  (aai kuthe kay kartye) या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले- प्रभुलकर(madhurani prabhulkar). उत्तम अभिनयाच्या जोरावर मधुराणीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात.

मधुराणीदेखील कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे वरचेवर ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे फोटोही शेअर करते. यात अलिकडेच मधुराणीने एक फोटोशूट केलं असून त्या फोटोंचा कोलाज करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने क्रिम कलरची सिल्कची साडी नेसली असून त्यावर गडद मरुन रंगाचं सिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातील चुप गया हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कायम साध्या साडीत वावरणाऱ्या मधुराणीचा हा ग्लॅमरस अंदाज नेटकऱ्यांना विशेष आवडला आहे. त्यामुळे सध्या त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा