Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिमीटर अब सेंटिमीटर हो गया! पाहा आता कसा दिसतो '3 इडियट्स'चा तो प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:07 IST

'3 इडियट्स'मध्ये 'मिलीमीटर' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

'३ इडियट्स' (3 Idiots) हा बॉलिवूडमधला सर्वात सुपरहिट सिनेमा. कथा, अभिनय आणि गाणी अशा सगळ्याच दृष्टीने हा सिनेमा उत्तम होता. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा, इंजिनिअरिंगमधील अडीअडचणी दाखवणारा, विद्यार्थ्यांच्या समस्या हटके पद्धतीने मांडणारा हा सिनेमा होता. '3 इडियट्स'मध्ये 'मिलीमीटर' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता हा अभिनेता कसा दिसतो, काय करतो याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. बघुया मिलीमीटर आता कसा दिसतो?

राजकुमार हिरांनींच्या ३ इडियट्समध्ये राहुल कुमारने (Rahul Kumar) मिलीमीटर ही भूमिका साकारली होती. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची तो कामं करायचा. लाँड्री, गरजेच्या वस्तू आणून देणे, अभ्यासक्रमात लागणाऱ्या पेपर्सचे झेरॉक्स आणऊन देणे अशी अनेक कामं तो करायचा. आता हा मिलीमीटर खऱ्या आयुष्यातही सेंटिमीटर झाला आहे. त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. राहुल कुमारचं खरं नाव राहुल शर्मा असं आहे. राहुलने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. 

राहुलने ओमकारा सिनेमा सैफ अली खानच्या मुलाचा रोल प्ले केला होता यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. याशिवाय तो 'ब्लू अंब्रेला' सिनेमातही दिसला. राहुलने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही काम केलं आहे. तर 'बंदिश बँडिट्स' या प्रसिद्ध वेबसिरीजमध्येही तो झळकला आहे. २०२१ साली आलेल्या परिणीती चोप्राच्या 'संदीप और पिंकी फरार' सिनेमात तो शेवटचा दिसला. चित्रपटांशिवाय तो 'फिर भी ना माने बद्तमीज दिल','यम है हम','नीली छतरी वाले' या मालिकांमध्येही झळकला आहे. मिलिमीटर खऱ्या अर्थाने सेंटिमीटर झाला आहे.  

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडआमिर खान