शबरी आवास योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:40 IST2020-09-10T21:39:56+5:302020-09-10T21:40:18+5:30
शिंदखेडा : आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

dhule
धुळे : शिंदखेडा नगरपंचायत हद्दीत शबरी आवास योजना लागु करावी, अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.
शिंदखेडा नगरपंचायतीचे काँग्रेसचे नगरसेवक दिपक दशरथ भिल, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, राजेश मालचे, सुनिल सोनवणे, शाम ठाकरे, प्रा. जिभाऊ अहिरे आदींनी घरकुलांच्या मागणीसाठी नुकतीची जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटूंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असून हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे शिंदखेड्यात आदीवासी कुटूंबांसाठी शबरी आवास योजना लागु करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.