RR vs RCB Latest News : युजवेंद्र चहलनं घेतल्या सलग दोन विकेट् अन् धनश्री वर्माचं सेलिब्रेशन, Video

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) रॉबीन उथप्पाला सलामीला पाठवण्याचा डाव यशस्वी ठरला. उथप्पाला आज सूर गवसलेला दिसला, RRकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकानं राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 05:56 PM2020-10-17T17:56:56+5:302020-10-17T17:58:03+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB Latest News : Yuzvendra Chahal’s Fiance Dhanashree Verma Celebrates As Chahal Picks Two In Two Deliveries, Video | RR vs RCB Latest News : युजवेंद्र चहलनं घेतल्या सलग दोन विकेट् अन् धनश्री वर्माचं सेलिब्रेशन, Video

RR vs RCB Latest News : युजवेंद्र चहलनं घेतल्या सलग दोन विकेट् अन् धनश्री वर्माचं सेलिब्रेशन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) रॉबीन उथप्पाला सलामीला पाठवण्याचा डाव यशस्वी ठरला. उथप्पाला आज सूर गवसलेला दिसला, RRकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकानं राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) ख्रिस मॉरिसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात सलग दोन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली होती. युजीच्या या यशानंतर भावी पत्नी धनश्री वर्मानं केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलामीला आलेल्या रॉबीन उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. त्यानं पदलालित्य दाखवत सुरेख फटके मारले. बेन स्टोक्स संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु ख्रिस मॉरिसनं टाकलेल्या सहाव्या षटकात स्टोक्स ( १५) बाद झाला. शाह'बाज' चा सुपर डुपर झेल; स्टीव्ह स्मिथची काढली विकेट; पाहा व्हिडीओ

विराट कोहलीनं ८वे षटक युजवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलनं RRला मोठा धक्का दिला. त्यानं २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४१ धावा करणाऱ्या उथप्पाला माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर सॅमसनही ( ९) बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. ख्रिस मॉरिसनं ही भागीदारी तोडली. जोस बटलर २४ धावांवर माघारी परतला. पण, स्मिथनं एका बाजूनं फटकेबाजी करताना ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 

स्मिथ आणि राहुल टेवाटिया यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर शाहबाज अहमदनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. टेवाटिया १९ धावांवर नाबाद राहिला. स्टीव्ह स्मिथची 'Jumping Boundary' पाहिलीत का?; गोलंदाजानं खांजवलं डोकं, Video

पाहा युजवेंद्र चहलच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स अन् धनश्रीचं सेलिब्रेशन


युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 8 ऑगस्टला साखरपुडा केला.  चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला.  त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले. त्याच्या या फोटोवर नेटिझन्स आता त्याची फिरकी घेत आहेत. युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.

Web Title: RR vs RCB Latest News : Yuzvendra Chahal’s Fiance Dhanashree Verma Celebrates As Chahal Picks Two In Two Deliveries, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.