RR vs RCB Latest News : Robbie Uthappa crosses 4500 runs in Indian Premier League, become sixth indian player | RR vs RCB Latest News : रॉबीन उथप्पा सलामीला आला, वॉशिंग्टनच्या षटकात चार चौकार खेचले अन् नोंदवला विक्रम

RR vs RCB Latest News : रॉबीन उथप्पा सलामीला आला, वॉशिंग्टनच्या षटकात चार चौकार खेचले अन् नोंदवला विक्रम

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आज RRने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IPL 2020त सातत्यानं अपयशी ठरलेल्या रॉबीन उथप्पाला RRने बेन स्टोक्ससह सलामीला पाठवण्याचा डाव खेळून जोस बटलरवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली आहे. उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. 

  • Rajasthan Royals XI: बेन स्टोक्स, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबीन उथप्पा, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी.
  • Royal Challengers Bangalore XI: आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरीस, सेहजाद अहमद, इसुरू उदाना, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, जी सिंग. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज  
विराट कोहली - ५७१६
सुरेश रैना - ५३६८
डेव्हिड वॉर्नर - ४९९०
शिखर धवन - ४८३७
एबी डिव्हिलियर्स - ४६२५
महेंद्रसिंग धोनी - ४५६५
ख्रिस गेल - ४५३७
रॉबीन उथप्पा - ४५१२*

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RR vs RCB Latest News : Robbie Uthappa crosses 4500 runs in Indian Premier League, become sixth indian player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.