RCB vs RR Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 3, 2020 07:19 PM2020-10-03T19:19:45+5:302020-10-03T19:35:22+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs RR Latest News : Virat Kohli become a First Player to Reach 5500 Runs in The IPL History | RCB vs RR Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

RCB vs RR Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात RCBने बाजी मारली. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निराशाजनक कामगिरीनंतर RCBचा डाव देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि विराट कोहली  (Virat Kohli) यांनी सावरला. या सामन्यात विराटनं भीमपराक्रम केला. 


राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. पण, RRचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पराग ( 16) माघारी परतला. लोम्रोरही 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला.  राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.  

धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. देवदत्तानं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराटनेही 41 चेंडूंत 50 धावा केल्या. IPLमधील 8 डावांनंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे IPLमधील 37वे अर्धशतक ठरले. विराट-देवदत्तची 99 धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरने तोडली. देवदत्त 63 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटनं अखेरपर्यंत खिंड लढवून RCBचा विजय पक्का केला. विराटनं IPLमध्ये 5500 धावांचा पल्लाही ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. 

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली - 5502
सुरेश रैना - 5368
रोहित शर्मा - 5068
डेव्हिड वॉर्नर - 4821
शिखर धवन - 4648

Web Title: RCB vs RR Latest News : Virat Kohli become a First Player to Reach 5500 Runs in The IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.