RCB vs CSK Latest News : Virat Kohli completes his 200 sixes in IPL, third player hit 200 sixes in single team  | RCB vs CSK Latest News : विराट कोहलीचा पराक्रम; ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्सनंतर असा विक्रम करणारा तिसरा खेळाडू

RCB vs CSK Latest News : विराट कोहलीचा पराक्रम; ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्सनंतर असा विक्रम करणारा तिसरा खेळाडू

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आता उरलेल्या तीन सामन्यांत आयपीएल २०२१च्या संघबांधणीच्या दृष्टीनं प्रयोग करताना दिसणार आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या आजच्या सामन्यात त्यांनी दोन बदल केले आहेत. मिचेल सँटनर आणि मोनू सिंग यांना अनुक्रमे जोश हेझलवूड व शार्दूल ठाकूर यांच्या जागी स्थान दिले आहे. RCBनेही संघात इसुरू उदानाच्या जागी मोईन अलीला संधी दिली आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. फॉर्मात असलेल्या सॅम कुरननं चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिंचला ( १५) बाद केले. पडीक्कल CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल सँटनरनं त्याला बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला. त्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनं RCBच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. विराटनं या सामन्यात एक षटकार खेचून IPLमध्ये २०० Six मारण्याचा विक्रम नावावर केला. 

एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज - ख्रिस गेल ( २३९ / RCB), एबी डिव्हिलियर्स ( २१८/RCB) आणि विराट कोहली ( २००*/ RCB)  

IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू - ख्रिस गेल ( ३३६), एबी डिव्हिलियर्स ( २३१), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २०९), विराट कोहली ( २००*)  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs CSK Latest News : Virat Kohli completes his 200 sixes in IPL, third player hit 200 sixes in single team 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.