...म्हणून शिखर धवनची पत्नी नेहमी घालते टोपी

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला पाठींबा देण्यासाठी त्याची पत्नी आयशा मुखर्जी नेहमी स्टेडियमवर उपस्थित असते.

मात्र, स्टेडियमवर उपस्थित असणारी आयेशा नेहमी टोपी घातलेली पाहायला मिळते.. यामागचं कारण तिने अखेरिस सांगितले.

तिने सोशल मीडियावर याचा खुलासा केला. ती म्हणाली,''मी नेहमी टोपी का घालते, हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. मी रोज फिटनेस ट्रेनिंग करते. त्यानंतर कुटुंबासाठी संपूर्ण वेळ घालवते. त्यांच्यासाठी जेवण बनवणे, घराची साफसफाई, मुलांना शाळेत सोडणे, व्यावसाय पाहणे, मुलांसोबत खेळणे, यु ट्यूब चॅनेलसाठी व्हिडीओ तयार करणे.. या सर्व गोष्टी मला कराव्या लागतात.''

ती पुढे म्हणाली,''इतकी काम असल्यामुळे केस विंचरण्यात मी वेळ वाया घालवत नाही. माझ्यासाठी हा वेळेचा दुरुपयोग आहे. हा वेळ मी अन्य कामासाठी वापरते. त्यामुळे मी नेहमी टोपी घालते.''